गणेश स्तवन


शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी
वंदन करिते तुला
बुद्धी दे तुझे स्तवन करण्याला !!


मुकुट मणी शिरी शोभून दिसतो
टिळक केशरी भाळी शोभतो
मनोमनी मी तुजसी भाते
द्यावा आशिष मला !!१!!


सोंड तुझी जरी मोठी असते
तुजला परी ती शोभून दिसते
लंब अशा तुझिया उदराला
मोदक मी अर्पिला !!२!!


दुर्वांकुर प्रिय, अति रे तुजला
एकविसांची तुज , वाहुनी माला
सुमन जास्वंद तुजसी अर्पूण
आरंभ करी कार्याला !!३!!



उमलत्या कळ्या


अवघे सारे मिळूनी

एक काम करूया

उमलत्या कळ्यांना

जीवदान देऊ या !! धृ !!



बाबा तुमची लेक आज

येउद्या जन्माला

उद्याची असेल ती

तुमचीच छाया !! १ !!



नऊ मास उदरात

ठेव मला आई

नको करू मला तू

मारण्याची घाई !!२!!



नऊ मास होताच

येईल जन्माला

विसरणार नाही मी

तुझ्या गं ऋणाला !!३!!



आजीलाही सांग नात

आतुरली भेटीला

नातवासाठी नको तू

छळूस सुनेला !!४!!



शिकून मी होईन

खूप खूप मोठी

काम हि करेल मी

आई तुझ्या साठी !!५!!



आस एक मनामध्ये

दाटून ती आली

घटी भरले अमृत

मुखी माझ्या देई !!६!!



दादासंगे मस्ती मी

घालणार नाही

तुझे म्हणणे सारे मी

ऐकेल गं आई !!७!!



घासातील घास माझ्या

देईल दादाला

मी गेल्यावर राखी कोण

बांधेल दादाला !!८!!



आई बाबा तुम्हाला

सांगणे ते एक

जन्मा येऊ द्या तुमची

अभागी हि लेक !!९!!



अंतरीची हाक तू

जाणून घे आई

उमलत्या कळीला

नको खुडू आई !!१०!!



उमलत्या कळ्यांना

तुम्ही आज खुडता

कशी येईल जन्माला

उद्याची गं माता !!११!!



क्षमा कर बेटी तुझ्या

लाडक्या बाबाला

जीवा पल्याड जपेल मी

माझ्या गं कळीला !!१२!!



ससा आणि कासव


ससा आणि कासवाची

एकदा लागली शर्यत

ससा सुटला पळत पळत

कासव चालले डुलत डुलत

वाटेत लागले गाजराचे शेत

सशाने आपला बदलला बेत

हळूच मागे वळून पाहिलं

त्याला कासव नाही दिसल

सशाला लागली खूप भूक

पोटभर गजरे केली गुडूप

सुस्तीही आलि त्याला खूप

सशाने मनी केला विचार

कासव अजून दूर आहे फार

सशाने घेतले गवतावर झोपून

कासवाने पहिले त्याला दुरून

कासव होते दमलेले

कुठेही नव्हते थांबलेले

कासवान गाठला नदीचा काठ

ससा आला मागून जोरात

नदीवर पाहुन कासवाला

ससा मनी ओशाळला

कासवाची सशाने थोपटली पाठ

हलकेच मिळवला हातात हात

गर्वाचे घर खाली झाले

कासव शर्यतीत पहिले आले.



तो सोन्याचा दिवस


अशीच आमुची आई असती

सुंदर रूपवती

आम्हीही सुंदर झालो असतो

वदले छत्रपति



राजे तुमचा काळ

पुन्हा एकदा येवू द्यात

साऱ्या आया बहिणींना

सुखाची झोप मिळूद्यात



राजे येथील अत्याचाराची

तुम्हाला कल्पना नसेल

ते अत्याचारी नराधम

वयाचाही विचार करत नाहीत



आहो चार वर्षंच्या बालीकेलाही ते

सुनं सोडत नाहीत

काय म्हणावं त्यांच्या या दुष्कृत्याला

परमेश्वरही कधी माफ करणार नाही त्यांना



बाळाच्या प्रसव वेदना स्त्री

जशी सहन करते

कारण सहनशीलता तिच्या

अंगी भिनलेली असते



तशीच कसायाकडून होणारे आत्याचारही

ती अब्रूपोटी सहन करते

अन अगदी सहज ती

कसायाच्या हाताची गाय बनते



कारण शिंगे उगरणाऱ्या गायीला

मरणच पत्करावे लागते

आहो छोट्या छोट्या शहरात सोडा

दिल्लीतही रोज हेच घडते



आशा या कसायांचा

शिरच्छेद करण्यासाठी

आणि आजच्या स्त्रीला

मुक्तपणे वावरण्यासाठी



राजे तुम्हाला सांगणे एक आहे

जिजाऊ मातांसारख्या माता

या पृथ्वीतलावर

पुन्हा एकदा जन्मा येऊ द्यात



आणि तुमच्या सारखेच

शिवाजीराजे त्यांच्या पोटी

जन्मा येवू द्यात



मग बघा कस आपल्या देशाच

नंदनवन होईल

आणि स्त्रीलाही निर्भयपणे जगता येईल



तो सोन्याचा दिवस

लवकरच येवो

हाच आहे प्रत्येक स्त्रीच्या

अंतरीचा टाहो

तो सोन्याचा दिन येवो

तो सोन्याचा दिन येवो.

स्त्री भृणहत्या पोवाडा



नारी जातीच्या जन्मा येउनी , काय असा मी केला गुन्हा

मुलगी म्हणुनी जन्मा आले , हाच होई काय माझा गुन्हा

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!धृ !!



माझ्या जन्माची करून कहाणी , ऐका सांगते मी हो तुम्हा

अहो चाहूल लागता मातृत्वाची, तपासणी केली आईची

अन गर्भ मुलीचा समजताच हो, केली तयारी मारण्याची

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!१!!



स्त्रीभ्रूण हत्या करुनी तुम्ही, नका करू स्त्रीचा अपमान

दोन्ही कुळाची ज्योत ती असते, याच असुद्या तुम्हास भान

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!२!!



नारिविना का जन्म जाहला, सांगा कोणत्या नराचा

नर नारीचा जन्म हि दोन्ही, जगती आहे मोलाचा

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!३!!



स्त्रीच्याच पोटी जन्म घेतला, बाजी शिवाजी अन झाशीने

अन मुलगी झाली म्हणुनी आई, तुलाच का पडले कोडे

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!४!!



कल्पना चावला इंदिरा गांधी, याही ठरल्या जगी थोर

अन प्रतिभाताई पाटील यांना, राष्ट्रपतीचा हो मान

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!५!!



अग मीही मोठी होईन म्हणते, पोटी तुझ्या ग जन्मून

नकोस आई मारूस मजला, स्त्री जन्माला जागून

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!६!!


चूकच झाली माझी बेटा, असे पुन्हा नाही होणार

स्त्री जन्माला येऊन मीही, स्त्री जातीला जागविणार

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!७!!



ऐक सांगते सखे तुला ग, गोष्ट एक ती मोलाची

मुलगा अथवा मुलगी असो ग, दोन्ही लेकरे आईची 

जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!८!!

शेतकरयाच दुखं


आला मेघराजा पहा

कसा येळला धावून



चला चला हो घरधनी

जुपा बैल औताला

लागू पेरणी कराया



बीज अंकुरे जोमात

होईल धान्याची बरकत



किरपा करी मेघराजा

पाणी मिळूंदे येळला



पिक येईल तरारून

मन जाईल हरखून



पिक येता हो भरात

तोंड पावसान दडविल



पिक जोमाच जळाल

पाणी तोंडच पळाल



धनी भाकर खाईना

पाण्याचा घोट हि घेईना



मनी काय चाले त्याच्या

मला काय बी समजणा



दिसरात मनी झुर

डोळ्याचा पाणी ना खळ



उदास मनान काढून रीन

केली दुबार पेरण



अवकाळी मेघराजा

बाई आला ग धावून

हाती आलेल पिक, पिक गेलं ते वाहून



काय म्हणाव या भोगा

कुणी सांगल का मला



जेंव्हा पिक शेतात येतं

तवा खायला मिळत



न पिकता शेतात

घर जातं हो कर्जात



होता कर्जाचा डोंगर

धान्याचा दडपतो ऊर



मनी कोंडतो श्वास

मुखी अडतो घास



चिंता त्याला पोरांच्या भविष्याची

चिंता मुलीच्या लग्नाची



चिंता जाळते जिवासी

झोप येईना धन्यासी



मनी करी तो विचार

सार संपवावं जीवन



जाऊन सांगे कारभारणीला

आता संसार सांभाळ



माझ्या घरधन्या तू रं

नको करू र किरं



थोडा करून विचार

काढू उपाय यावर



शेताच्या कामाबिगर काम

नको बाळगू त्याची लाज



हाती मिळेल ते काम

तू कर रे नेटान



मग एक दिस तुझं

बघ सुटल ग्रहण



देह त्यागून ना सुटे

कधी जीवनाचा प्रश्न



तुझ्या बायको मुलांना

सांग कुणी रं बघाव



तुमच्या मरणान आमचा

प्रश्न नाही हो सुटत



तुमच्या सारखच मनी

उठत दुखाच काहूर



गोष्ट मोलाची धनी सांगते तुम्हाला

बायको असते रथाच दुसरं हो चाक



मुलं असती त्या रथातली त्रैलोक्य

त्रैलोक्याला झिडकारून असे दूर नका जाऊ



येडेपणा करून तुम्ही जीव नका देऊ

चला विनवू देवाला सुखी ठेव तु आम्हाला

उदंड आयुष्य लाभू देरे माझ्या जिवलगा

गौळण


पाण्याला जायला उशीर झाला

अडवी कान्हा मला गं बाई बाई

अडवी कान्हा मला !!धृ !!




कारे कान्हा अडविली वाट

फुटेल माझा डोईचा माठ

सासू भरेल रागे मला रे

सासू भरेल रागे मला !!१!!




नको रे कान्हा काढूस खोडी

नणंद माझी करेल चाढी

माझा होईल बोलबाला रे

माझा होईल बोलबाला !!२!!




एका जनार्दनी कृष्ण मुरारी

घेवून आला हाती बासरी

बासरीच्या नादे राधेचा बाई

जीव वेडावला गं बाई जीव वेडावला !!३!!

लोकप्रिय पोस्ट