नारी जातीच्या जन्मा येउनी , काय असा मी केला गुन्हा
मुलगी म्हणुनी जन्मा आले , हाच होई काय माझा गुन्हा
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!धृ !!
माझ्या जन्माची करून कहाणी , ऐका सांगते मी हो तुम्हा
अहो चाहूल लागता मातृत्वाची, तपासणी केली आईची
अन गर्भ मुलीचा समजताच हो, केली तयारी मारण्याची
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!१!!
स्त्रीभ्रूण हत्या करुनी तुम्ही, नका करू स्त्रीचा अपमान
दोन्ही कुळाची ज्योत ती असते, याच असुद्या तुम्हास भान
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!२!!
नारिविना का जन्म जाहला, सांगा कोणत्या नराचा
नर नारीचा जन्म हि दोन्ही, जगती आहे मोलाचा
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!३!!
स्त्रीच्याच पोटी जन्म घेतला, बाजी शिवाजी अन झाशीने
अन मुलगी झाली म्हणुनी आई, तुलाच का पडले कोडे
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!४!!
कल्पना चावला इंदिरा गांधी, याही ठरल्या जगी थोर
अन प्रतिभाताई पाटील यांना, राष्ट्रपतीचा हो मान
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!५!!
अग मीही मोठी होईन म्हणते, पोटी तुझ्या ग जन्मून
नकोस आई मारूस मजला, स्त्री जन्माला जागून
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!६!!
चूकच झाली माझी बेटा, असे पुन्हा नाही होणार
स्त्री जन्माला येऊन मीही, स्त्री जातीला जागविणार
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!७!!
ऐक सांगते सखे तुला ग, गोष्ट एक ती मोलाची
मुलगा अथवा मुलगी असो ग, दोन्ही लेकरे आईची
जी जी र जी. माझी आई तू ग, माझी सखी तू ग ,माझी आई तू ग … !!८!!