तो सोन्याचा दिवस


अशीच आमुची आई असती

सुंदर रूपवती

आम्हीही सुंदर झालो असतो

वदले छत्रपति



राजे तुमचा काळ

पुन्हा एकदा येवू द्यात

साऱ्या आया बहिणींना

सुखाची झोप मिळूद्यात



राजे येथील अत्याचाराची

तुम्हाला कल्पना नसेल

ते अत्याचारी नराधम

वयाचाही विचार करत नाहीत



आहो चार वर्षंच्या बालीकेलाही ते

सुनं सोडत नाहीत

काय म्हणावं त्यांच्या या दुष्कृत्याला

परमेश्वरही कधी माफ करणार नाही त्यांना



बाळाच्या प्रसव वेदना स्त्री

जशी सहन करते

कारण सहनशीलता तिच्या

अंगी भिनलेली असते



तशीच कसायाकडून होणारे आत्याचारही

ती अब्रूपोटी सहन करते

अन अगदी सहज ती

कसायाच्या हाताची गाय बनते



कारण शिंगे उगरणाऱ्या गायीला

मरणच पत्करावे लागते

आहो छोट्या छोट्या शहरात सोडा

दिल्लीतही रोज हेच घडते



आशा या कसायांचा

शिरच्छेद करण्यासाठी

आणि आजच्या स्त्रीला

मुक्तपणे वावरण्यासाठी



राजे तुम्हाला सांगणे एक आहे

जिजाऊ मातांसारख्या माता

या पृथ्वीतलावर

पुन्हा एकदा जन्मा येऊ द्यात



आणि तुमच्या सारखेच

शिवाजीराजे त्यांच्या पोटी

जन्मा येवू द्यात



मग बघा कस आपल्या देशाच

नंदनवन होईल

आणि स्त्रीलाही निर्भयपणे जगता येईल



तो सोन्याचा दिवस

लवकरच येवो

हाच आहे प्रत्येक स्त्रीच्या

अंतरीचा टाहो

तो सोन्याचा दिन येवो

तो सोन्याचा दिन येवो.

लोकप्रिय पोस्ट